June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog

कल्याण पूर्वेतील विकासकामांना गती देण्यात यावी, आ. सुलभा गायकवाड यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील रखडलेल्या विकास कामांना गती देऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. काही कामांचा शासन दरबारी प्रस्ताव पाठवून ती मंजूर करून घेण्यात यावी यासाठी कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भरत घेतली. लोकोपयोगी विविध विकास कामे, तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या कामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. .ही विकासकामे तातडीने मार्गी लाऊन सामान्य जनतेला लवकरात लवकर योग्य न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या असे निवेदन या भेटीत आयुक्त डॉ. जाखड यांना देण्यात आले. आयुक्त जाखड यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले..

विकास कामाचे ठळक मुद्दे खालील प्रमाणे :

कल्याण पुर्वेतील तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप 24 मीटर (80 फूट) रस्त्याच्या बायोमेट्रीक सर्व्हेची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी तसेच कल्याण पुर्वेतील तिसगाव नाका ते काटेमानिवली नाका या यु टाईप 24 मीटर (80 फूट) रस्त्याच्या काम जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न करावे व नागरिकांचे पुनर्वसन करावे.

कल्याण पूर्व येथील 100 फुटी रोड लगत रुग्णालया करिता (आरक्षण क्र. 283) आरक्षित असलेली 30 हजार चौ.मी. जागा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करून या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारण्याकरिता लागणारा निधीसाठीचा प्रस्ताव तातडीने राज्यशासनाकडे सादर करण्याबाबत..

कल्याण पूर्वेतील मराठा कोळशेवाडी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगण येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य शिवस्मारक होणे बाबतकल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडांगण व त्या समोरील राजर्षी शाहू उद्यान हे एकत्र करून युटाईप रस्ता रुंदीकरण करतांना गणपती मंदिर चौक मराठा कोळशेवाडी ते सिद्धार्थनगर स्काय वॉक समांतर रस्ता तयार करणे बाबत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर व पाणी बिलाची थकबाकी असणाऱ्या करदात्यावर आकारण्यात येणारे दंड/व्याज 100 टक्के माफ करण्यासाठी अभय योजना सुरु करणे बाबत..

कल्याण पूर्व येथील 100 फुटी रोड लगत क्रीडासंकुल आरक्षण क्र. 279 आरक्षित जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया नगररचना विभागाच्या दिरंगाईमुळे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने सदरची जमीन अधिग्रहण प्रक्रिया तातडीने सुरु करणे तसेच क्रीडासंकुल उभारण्याकरिता लागणारा निधीसाठीचा डी.पी.आर. त्वरित राज्य शासनाकडे सादर करणेबाबत

कल्याण पुर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार परिसरामधील पाणी समस्या तसेच अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकणे व जलकुंभ बनविण्याच्याचे संथ गतीने सुरु असल्याबाबत.चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार या नव्याने समाविष्ठ झालेल्या ग्रामीण भागात पथदिवे बसविणे..

आरडीएसएस योजने अंतर्गत प्रस्तावित उपकेंद्र महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीला 22/11 के.व्ही. उपकेंद्रासाठी 3000 चौ.मी. जागा उपलब्ध करून देणे.कल्याण पूर्वेतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग क्र.100 तिसगाव गावठाण, सर्व्हे नं. 86 आरक्षण क्र.443 येथे जलकुंभ तातडीने बनविणे.

नवी मुंबई महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील 500 चौरस फुटा पर्यतच्या घरांवरील मालमत्ताकर माफ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास पाठविण्याबाबत.

गेल्या पाच वर्षांपासून आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या ठेकेदारा मार्फत कल्याण पूर्वेतील “4-जे” प्रभाग क्षेत्र अंतर्गत घनकचरा विभागात कार्यरत 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समावून घेण्याबाबत.

कल्याण पुर्वेतील विशेषतः चिंचपाडा, आशेळे, माणेरे, द्वारली, नांदिवली व वसार परिसरामधील पाणी समस्या तातडीने सोडवण्यासाठी योग्य त्या उपयायोजना करण्याबाबत तसेच पाणी समस्या संपुष्टात येईपर्यत दररोज टॅकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्याबाबत..

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *