June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

करुणा मुंडेंच्या वाहनात शस्त्र ठेवणाराही पोलिसच.. आमदार सुरेश धस यांनी केली कारवाईची मागणी

“बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष पथकातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल देशमुख कुटुंबीयांना शंका आहे. त्यामुळे या मंडळींना तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे..वाल्मीक कराडने गडचिरोली येथून बदली करून आणलेला एक पोलिस कर्मचारीही यात आहे. काही लोक त्याच्या अतिसंपर्कात आहेत, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला.धस यांनी शुक्रवारी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. खुनातील आरोपी सुदर्शन घुले हा कराडच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे..आपल्या ‘आका’ला (वाल्मीक कराड) ‘आम्ही किती खतरनाक आहोत’ हे दाखविण्यासाठी त्यांनी इतक्या निर्घृणपणे हत्या केली असावी. परंतु, आता सीडीआरमधून सगळे बाहेर येणार आहे. त्यामुळे ‘आका’ बचावणे अशक्य आहे, असे धस यांनी सांगितले..तसेच, संतोष देशमुख हत्या हा विषय पक्षाचा राहिला नाही तर जनआक्रोश आहे. याचे निराकरण व्हायला हवे, असे सुरेश धस यांनी व्यक्त केले. आपण परभणी, पुणे येथील मोर्चात सहभागी होणार असून संभाजीराजे छत्रपतींनी राज्यपालांना याबाबत भेटण्यासाठी सोबत बोलावले आहे, तिथेही जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले..

करुणा मुंडेंच्या वाहनात शस्त्र ठेवणाराही पोलिसच

करुणा मुंडे यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारी व्यक्ती देखील पोलिस दलातीलच होती. त्याने कोणाच्या सांगण्यावरून ‘ते’ काम केले, त्याचे नाव देखील मला माहिती असून ते आपण पोलिस अधीक्षकांना सांगणार आहोत, असे धस म्हणाले. परळीत औष्णिक वीज केंद्राच्या राखेचे भयाण वास्तव आहे. सिरसाळा येथे तीनशे अवैध वीटभट्ट्या आहेत. ज्याने राख उचलण्याचे कंत्राट घेतले आहे, त्याचे वाहन सुद्धा तिथे उभा करू देत नाहीत. याबाबत आपण पत्र दिले आहे. प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई नाही केली, तर ते प्रदूषण रोखण्यास अयशस्वी ठरले याबाबत कारवाईची मागणी करणार आहे, अशी भूमिका धस यांनी मांडली.

फडणवीस अथवा पवारांनी व्हावे पालकमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत होईपर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घ्यावे. त्यांना शक्य नसेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावे. ते देखील चांगले काम करू शकतात, असेही सुरेश धस म्हणाले. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांचेच आमदार प्रकाश सोळंकेंची आहे. नैतिकतेच्या आधारावर सोळंकेंच्या मागणीला आपला पाठिंबा आहे. या प्रकरणात त्यांचा संबंध आहे, असे आपण म्हणणार नाही. पण, देशमुख खून प्रकरणाची चार्जशीट दाखल होईपर्यंत त्यांनी बिनखात्याचे मंत्री राहावे.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *