June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog आणखी आरोग्य व शिक्षण ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

महापालिका भरतीसाठी २५ हजारांहून अधिक जणांची ऑनलाइन नोंदणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील ६२० रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २८ मार्चपासून सुरू झाली असून ८ दिवसांतच २५ हजारांहून अधिक जणांनी ऑनलाइन नोंदणी केली. या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ११ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेत २००८ सालानंतर प्रथमच सर्वात मोठी भरती केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने लोकसत्ताला दिली आहे. भरतीमध्ये विविध ३० प्रकारच्या ६२० कायम जागांसाठी ही भरती होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेतील ३९३५ पदांच्या २२१ संवर्गाच्या आकृतिबंधाला शासनाने २१ ऑगस्ट २०१७रोजीच मंजुरी दिली होती. शासनाकडे सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाल्यानंतर २००८ पासून अनेकजन सेवानिवृत्त झाले तर अनेकांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. त्यामुळे २००८ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या भरतीबाबतची सर्व माहिती नवी मुंबई महापालिकेच्या WWW.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या या भरतीमध्ये विविध ३० प्रकारची पदे भरली जाणार असून एकूण ६२० जागांसाठी भरती होत आहे.त्यामध्ये लिपिक – टंकलेखक, लेखा लिपिक तसेच स्टाफ नर्स व मिडवाईफ नर्स,कनिष्ठ अभियंता,आया, वॉर्डबॉय या पदांसाठी सर्वाधिक जागा आहेत.

या भरती प्रक्रियेत बायोमेडिकल इंजिनीअर, कनिष्ठ अभियंता, उद्यान अधीक्षक, उद्यान सहाय्यक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी,वैदकीय समाजसेवक, डेंटल हायजनिस्ट,डायलिसिस तज्ञ सांख्यिकी सहाय्यक इसिजी तंत्रज्ञ, सेन्ट्रल सर्जिकल सुपरवायजर, आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, सहाय्यक ग्रंथपाल अशा विविध ३० प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. पालिकेने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तसेच विविध पदे व त्यांची संख्या यांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक

ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी २८ मार्च रोजी सुरू करण्यात आली असून आठवडाभरातच २५ हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. तसेच ३५०० पेक्षा अधिक जणांनी ऑनलाइन परीक्षा शुल्कही भरले आहे. पालिकेच्या भरतीसाठी एक लाखपेक्षा अधिक उमेदवार सहभागी येतील अशी शक्यता आहे. -शरद पवार, उपायुक्त, प्रशासन विभाग, नमुंमपा

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये
  • मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग – ९०० रुपये

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *