आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त जागा भरणार
डॉ. यड्रावकर यांनी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या अधिष्ठाता कक्षात सर्व वरीष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. मेडिलकचा आढावा घेत उपाययोजनाबाबत काही सूचनाही केल्या. येथून ते मेयो रुग्णालयात गेले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. यड्रावकर म्हणाले, कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील ताण आणि रिक्तपदे लक्षात घेऊन मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी २०१२ पासून प्रयत्न सुरू आहेत.