अमरावती : बिल काढण्यासाठी घेतली लाच, महिला सरपंचाला अटक
अमरावती : बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या महिला सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्याच घरी लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या प्रकरणी खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू मुरलीधर सोळंके (३०, रा. सोनारखेडा) असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. त्या भातकुली तालुक्यातील सोनारखेडा येथे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणातील