गोठीवली भागात सिडकोच्या जागेवर बेकायदा इमारत बांधण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीत नव्याने उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही महापालिकेच्या काही विभाग अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. येथील गोठीवली भागात सिडकोच्या जागेवर बेकायदा इमारत बांधण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू असताना त्याविरोधात महापालिकेकडे तक्रारी करणाऱ्या रहिवाशांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहेत.