पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकने एका कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या एका बसला धडकली अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत