यंत्रणांच्या गैरवापराविरोधात एकत्र या; शरद पवार यांची भूमिका
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांच्या विरोधात चालविलेल्या मोहिमेच्या विरोधात भाजपेतर राज्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पत्र मिळाले असून, यासंदर्भात लवकरच मुंबई किंवा दिल्लीत बैठक होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय