कल्याण डोंबिवलीतील मतदारांनी रचला मतदान वाढीचा अध्याय, कल्याणमधील कमी मतदानाबद्दल निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती खंत
कल्याण : राज्यातील सर्वाधिक कमी मतदान हे कल्याण मतदार संघात होत असल्याची खंत केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घेतलेल्या एका निवडणूक विषयक आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील मतदान वाढविण्यासाठीचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासन, निवडणूक यंत्रणेवर होते. हे आव्हान पेलून स्थानिक पालिका, शासन प्रशासन यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यावेळी