डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्याचे काम विकास आराखड्याप्रमाणे होत नसल्याने नाराजी
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्यावर नवापाडा, कुंभारखाणपाडा, हनुमान मंदिर, अश्वमेध सोसायटी भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीतून सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. ही कामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रस्तावित रस्ते विकास आराखड्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. परंतु, विकास आराखड्यातील रस्त्याची सीमारेषा न पाळता या भागात मनमानी पध्दतीने, काही धनदांडग्याचा दबावाला बळी पडून गटारे, रस्तारुंदीकरण आणि