नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग
नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा झोपडपट्टीत यादव नगर भागातील भंगार गोडाऊनला पहाटे अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि ऑइल मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप घेतले. एमआयडीसी आणि नवी मुंबई मनपाच्या अग्निशमनदलाच्या सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. मंगळवारी (आज) पहाटे ४ वाजता दिघा येथील भंगार गोडाऊनला आग लागली. यात लाखोंचा माल जळून