डोंबिवली एमआयडीसीतील मालवाहू वाहने अडकली, पाण्याचे टँकर वेळेत पोहचत नसल्याने उत्पादनावर परिणाम
कल्याण : शिळफाटा रस्त्यावर जड, अवजड वाहनांना पाच दिवस बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून डोंबिवली एमआयडीसीत कच्चा माल घेऊन येणारी वाहने बंदीमुळे दिलेल्या वेळेत कंपनीत येणार नसल्याने उत्पादन कसे करायचे आणि कंपनीत तयार झालेला पक्का माल बाहेर कसा पाठवयाचा, या विवंचनेत डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक आहेत. तसेच, डोंबिवली एमआयडीसीला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. बहुतांशी