कंपनीच्या सीआरएस निधीतील दिव्यांवर दोन व्यक्तींचा डल्ला – गुहागर तालुक्यातील तळवली गावातील प्रकार
ग्रामपंचायतीचा बॅनर वापरून कंपनीची दिशाभूल आबलोली (संदेश कदम)गावाच्या विकासासाठी सीआरएस निधी मिळावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने एका कंपनीकडे अधिकृत पत्र पाठविले होते. या पत्राचा विचार करून कंपनीने ग्रामपंचायतीला मदत करण्याच्या उद्देशाने सीआरएस निधीतून गावासाठी पथदिवे मंजूर केले.मात्र, हे दिवे ग्रामपंचायतीकडे न देता गावातील दोन व्यक्तींनी परस्पर ताब्यात घेऊन गावात मनमानी पद्धतीने बसवले. एवढ्यावरच न थांबता, सदर