कल्याणमधील महिलेची एम.बी.बी.एस. प्रवेशाच्या नावाने पाच लाखाची फसवणूक
कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा गंधारनगर भागातील दोन इसमांनी एम. बी. बी. एस. प्रवेशाच्या नावाखाली येथील एका महिलेची पाच लाख १० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला या कल्याणमधील गोकुळनगरी गंधारनगर भागातच राहतात. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी