ऐरोली-काटई विद्युत टॉवरचा अडसर दूर
नवी मुंबई – मुंबई मार्गे चेट डोंबिवली आणि कल्याणकडे जाणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामात अडथळा असलेल्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसऱ्या उच्च दाबाच्या मोनोपोलो विद्युत टॉवरचे काम पूर्ण झाल्याने आता पुलाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. ऑक्टोबर २०२५