तालुक्यातील विविध विकास कामांबाबत वारंवार मागणी करूनही पूर्तता न झाल्याने आणि तालुका कृषी विभागातील अनागोंदी कारभारामुळे, दिनांक ७ ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली “टाळे ठोका आंदोलन” जाहीर करण्यात आले होते.मात्र, दिनांक ६ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी जत यांच्या पुढाकाराने कृषी अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, वन विभाग अधिकारी, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे अभियंते, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
बैठकीत पुढील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली –
वन विभाग : वृक्षारोपण उपक्रम होत असताना वृक्षतोडीवर नियंत्रण नाही. दररोज हजारो वृक्षांची कत्तल सुरू आहे.
नगरपालिका : स्थानिक विकासकामांवरील तक्रारी.
जलजीवन मिशन : 50% पेक्षा जास्त कामे अपूर्ण; झालेली कामे निकृष्ट. भ्रष्टाचार आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी.
कृषी विभाग :
पेरण्या 90% पूर्ण असूनही शेतकऱ्यांना युरिया वेळेवर मिळत नाही.
युरियासोबत इतर औषधे/खते घेण्यास भाग पाडणे.
कृषी सहाय्यक नेमून दिलेल्या गावात राहत नाहीत, योजनांची माहिती न देता निवडक शेतकऱ्यांनाच लाभ.
संजयराव कांबळे यांनी कृषी विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आणत शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्याची मागणी केली.
उपविभागीय अधिकारी नष्टे यांच्या मध्यस्थीने चर्चा होऊन, येणाऱ्या दहा दिवसांत सर्व विभागांच्या कामकाजात सुधारणा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे ७ ऑगस्ट रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील, कार्याध्यक्ष विनोद कांबळे, जत शहराध्यक्ष महादेव कोळी, युवक तालुकाध्यक्ष अविनाश वाघमारे, विनु कांबळे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

