Sanvidhanvarta Blog Blog ‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ – अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा यशस्वी उपक्रम!
Blog आरोग्य व शिक्षण ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ – अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा यशस्वी उपक्रम!

अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी ‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ अंतर्गत सिंगचुंग (२८ जानेवारी) आणि थ्रिजिनो (२९ जानेवारी) येथे मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांसाठी स्टेट कॅन्सर सोसायटीच्या कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनचा वापर डॉ. सॅम त्सेरिंग ( नोडल ऑफिसर ) यांच्या विशेष प्रयत्नांतून करण्यात आला . हा उपक्रम मा. आमदार श्री. तेनझिन न्यिमा ग्लोव ( 6 थ्रिजिनो- बुरगाव असेंब्ली ) यांच्या सौजन्याने राबवण्यात आला.

सिंगचुंग आरोग्य शिबिर (२८ जानेवारी २०२५)
उद्घाटन एडीसी सिंगचुंग श्रीमती मुर्निया काकी यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितींमध्ये श्रीमती जुमतेर ग्लोव (मा. आमदार तेनझिन न्यिमा ग्लोव यांच्या पत्नी), डॉ. ड्रोमा (MO, CHC सिंगचुंग) आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
✅ एकूण रुग्ण तपासणी: १२८
✅ सोनोग्राफी तपासणी: ४५

थ्रिजिनो आरोग्य शिबिर (२९ जानेवारी २०२५)
उद्घाटन वरिष्ठ नेते इंजि. श्री. बॉनी शक्रिन्सो यांच्या हस्ते झाले. यावेळी एडीसी थ्रिजिनो श्री. टोपिक काकी (APCS), डॉ. किरेन देरु (MO, थ्रिजिनो PHC) आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
✅ एकूण रुग्ण तपासणी: २३७
✅ सोनोग्राफी तपासणी:75

या मोहिमेत MICWS तर्फे चेअरमन श्री. खांडू थुंगोन , छबी सहायोग फाउंडेशन तर्फे महासचिव पार्थो रॉय, वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बी.के. पाटील, वरिष्ठ आरोग्य प्रशासक व अभियान संरक्षक डॉ. अविनाश गारगोटे, डॉ. दिव्या श्रीनिवास तसेच देव देश प्रतिष्ठान तर्फे डॉ. रविंद्र कांबळे, डॉ. स्नेहा भट्टे व जयगणेश लिंगाथार उपस्थित होते.

या यशस्वी उपक्रमाबद्दल अभियान संरक्षक डॉ. वैभव देवगिरकर ( अध्यक्ष – देव देश प्रतिष्ठान ) आणि प्रमुख संरक्षक मा. पी.के. थुंगोन सर ( प्रथम मुख्यमंत्री- अरुणाचल प्रदेश ) यांनी संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

वेस्ट कामेंग जिल्ह्यातील अनेक भागात प्राथमिक आरोग्य सुविधाही उपलब्ध नाहीत. यामुळे नागरिकांना वेळेवर निदान व उपचार मिळत नाहीत. ‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ अंतर्गत या दुर्गम भागातील नागरिकांसाठी तपासणी आणि उपचाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. स्थानिक नागरिकांचा भरघोस प्रतिसाद पाहता, भविष्यात या अभियानाचा अधिक विस्तार करण्यात येणार आहे.

Exit mobile version