रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने लंडन मध्ये नुकताच गौरव करण्यात आला.सुप्रसिद्ध उद्योजक वेदांता ग्रुप चे प्रमुख अनिल अग्रवाल आणि हिंदुजा ग्रुप चे प्रमुख संजय हिंदुजा यांच्या हस्ते नाम.रामदासजी आठवले यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक न्यायाच्या लढाई क्रांतिकारी योद्धे ठरलेल्या रामदासजी आठवले यांनी दलित वंचित गरीब बहुजन वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी भारतात प्रचंड मोठे योगदान दिले आहे.
https://www.youtube.com/sanvidhanvarta
भारतातील सामाजिक न्यायाच्या लढ्याचे मागील 50 वर्षांपासून कर्णधार राहिलेल्या रामदास आठवले यांचे कर्तृत्व जगभरातील परिवर्तनवादी समतावादी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्यामुळे केंद्रिय राज्यमंत्री,मान. रामदासजी आठवले यांना कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने लंडन मध्ये आज सन्मानित करण्यात आले.दैनिक लोकमत च्या वतीने कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लंडन मधील सवय या हॉटेलात आयोजन करण्यात आले होते. लोकमत समूहाचे विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यावेळी उपस्थित होते. यावेळी लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्व्हेशन चे आयोजन करण्यात आले होते.दैनिक लोकमतने आपल्याला कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल नाम.रामदासजी आठवले यांनी लोकमत चे विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांचे आभार मानले आहेत.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988