“Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये शनिवारी मोठी घडामोड घडली. बीड पोलिसांच्या विशेष पथकाने हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या तापासामध्ये काय होतं? खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड या खुनाच्या प्रकरणात अडकतो का, हे स्पष्ट होईल..
डॉक्टर वायबसे करतो तरी काय?
ज्याच्यामुळे बीड पोलिसांचं विशेष पथक आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेपर्यंत पोहोचले तो डॉक्टर वायबसे नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित आहे. वायबसे हा केज तालुक्यातल्या वाघिरा गावचा आहे. तो एक प्रॅक्टिश्नर डॉक्टर तर आहेच, त्यासोबत तो मुकादमदेखील आहे. एखादा ऊसतोड कामगार उचल घेऊन तोडीला आला नाही तर त्याच्यावर दाबदडप करण्याचं काम सुदर्शन घुलेमार्फत वायबसे करत असल्याचं पुढे येत आहे.
पोलिसांनी घेतलं ताब्यात
पोलिसांची स्पेशल एक्स्पर्ट टीम आरोपींशी संबंधित तांत्रिक माहितीचा तपास घेत होती. खूनाच्या घटनेपूर्वी, घटनेनंतर, फरारी झाल्यानंतर आरोपी कुणाकुणाशी बोलत आहेत, कुठे जात आहेत. याचा तपास ही टीम करत होती. त्यातच एक नाव पुढे आलं, ते म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे. डॉक्टर वायबसे हाच आरोपींना फरार होण्यास मदत करत होता, असा पोलिसांना संशय आला. .डॉक्टर वायबसे हा ९ तारखेपासून गावात नव्हता. एवढंच नाही तर एका नातेवाईकाचा मृत्यू झाला त्यवेळीही तो अंत्यविधीला हजर राहिला नाही. त्यामुळे पोलिसांची एक टीम पाच दिवसांपासून समांतरपणे वायबसेच्या मागावर होती. त्याला पोलिसांनी नांदेड येथून ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली. त्यातूनच आरोपींचा मागोवा पोलिसांना लागला. त्यानुसार बीड पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क करुन आरोपींचं लोकेशन काढलं आणि रात्रीतूनच मुख्य आरोपीला केली. त्यानंतर बीड पोलिसांनी एक प्रेस नोट काढली त्यातही संभाजी वायबसेचं नाव आहे..
बीड पोलिसांची प्रेसनोट जशासतशी
पो.स्टे.केज (जि.बीड) गुरनं 637/2024 कलम 103(2),140(1),126, 118(1),34(4),324(4)(5), 189(2), 190 भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल गंभीर व संवेदनशील गुन्हयात मयत सरपंच कै.संतोष देशमुख रा.मस्साजोग यांचे खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते. त्यांनी डॉ. संभाजी वायबसे याचेकडे चौकशी करुन गोपनिय माहितगार नेमुन तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करुन यातील पाहिजे आरोपी नामे 1) सुदर्शन चंद्रभान घुले वय 26 रा.टाकळी ता.केज व 2) सुधिर ज्ञानोबा सांगळे वय 23 रा. टाकळी ता.केज यांना ताब्यात घेवुन गुन्हे अन्वेषण विभाग, बीडचे श्री. अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक यांचेकडे पुढील तपासकामी ताब्यात देत आहोत.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988