Sanvidhanvarta Blog Blog जाने पोहायला शिकवलं त्याला बुडवायचा प्रयत्न करू नका अन्यथा तोही तुम्हाला बुडवू शकतो सचिनशेठ बाईत गरजले
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

जाने पोहायला शिकवलं त्याला बुडवायचा प्रयत्न करू नका अन्यथा तोही तुम्हाला बुडवू शकतो सचिनशेठ बाईत गरजले

आबलोली (संदेश कदम )
याच सभागृहात शिंदे सेनेचा मेळावा झाला त्या मेळाव्यात काही लोकांनी पक्ष प्रवेश केला आणि हे लोक सत्तेसाठी गेले आम्ही साहेब तुमच्या पाठी सत्यासाठी आहोत परंतु जे लोक सत्तेसाठी गेले त्यांच्यासाठी जाने पोहायला शिकवले त्याला बुडवायचा प्रयत्न करू नका अन्यथ: तोही तुम्हांला बुडवू शकतो असे विधान करून उभाठा पक्षाचे गुहागर तालुका प्रमुख सचिन शेठ पाहिजे त गरजले.

https://www.youtube.com/sanvidhanvarta
गुहागर तालुक्यातील हेदवतड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका गुहागर या पक्षाची गुहागर तालुक्यातील खारवी समाज सभागृह हेदवतड येथे वेळणेश्वर गटाचा शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी जाहीर मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत बोलत होते.
तालुका प्रमुख सचिन बाईत पुढे म्हणाले की, खऱ्या अर्थाने या गटाचे चित्र पाहिले तर संपूर्ण गट हा आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे याची आजची उपस्थिती साक्ष देते या गटात असे चित्र विरोधकांनी निर्माण केले की मच्छीमार समाज बाजूला जातोय परंतु आज आमच्या व्यासपीठावर मच्छीमार समाजाचे नेते उपस्थित राहिले ही सत्याची बाजू आहे मच्छीमार समाजाला नेतृत्व आमच्याच पक्षातून मिळू शकते मच्छीमार समाजाचे प्रश्न विधानसभेत आमदार भास्करशेठ जाधव यांनी सोडवले आहेत. त्यांच्या घरा खालच्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा भास्करशेठ जाधव साहेबांनी केली. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी अफवांना बळी पडू नये असे आव्हान शिवसेना उभाठा पक्षाचे तालुका प्रमुख सचिनशेठ बाईत यांनी केले
यावेळी व्यासपीठावर भास्करशेठ जाधव, विक्रांतदादा जाधव, सहदेव बेटकर, सुभाष मोहिते, विनायक मुळे,पाणगले गुरुजी, विलास गुरव, लतीफशेठ लालू,सौं. सिद्धी सुर्वे, अरुणाताई आंब्रे, पूर्वीताई निमुणकर, जयदेव मोरे, काशिनाथ मोहिते,रवींद्र आंबेकर, जगदीश गडदे, वनिता डिंगणकर, पारिजात कांबळे, स्नेहाताई वरंडे, प्रवीण ओक, आदी. कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याला हजारो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक विनायक मुळे यांनी केले तर विलास गुरव यांनी सूत्रसंचालन केले

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version