Sanvidhanvarta Blog राजकीय मनसैनिकांनो खचून जाऊ नका.पालिकेच्या निवडणुकीत दुपटीने वचपा काढू. मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील
राजकीय

मनसैनिकांनो खचून जाऊ नका.पालिकेच्या निवडणुकीत दुपटीने वचपा काढू. मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील

डोंबिवली: पक्षाची एकही सीट आली नाही,आता हा विषय संपला आहे.ज्याप्रकारे या विधासभेचा निकाल आला आहे.आपण सर्व राज साहेबांचे सहकारी आहोत.आता ते पालिकेची निवडणूक लवकर लावतील.आपल्यातील काहींना पालिकेच्या निवडणुका लढावायची असतील.

मनसैनिकांनो खचून जाऊ नका.पालिकेच्या निवडणुकीत दुपटीने वचपा काढू.आपण तयार रहायाचे आहे.आपल्याला कोणाच्या भरोशावर राहायचे नाही.कल्याण जिल्हाध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु करा.आपल्या सर्व सीट लढावायच्या आहेत.या निवडणुका पूर्वीसारख्या नाहीत. 

आपल्या गृहीत धरलं जात आहे असे मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद (राजू ) पाटील म्हणाले. डोंबिवलीत मनसैनिकांना मार्गदर्शन करतांन ते बोलत होते.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version