Sanvidhanvarta Blog Blog भारतीय सविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान दिवस सोहळा शहीद स्मारक माता रमाबाई आंबेकर नगर घाटकोपर पूर्व येथे संपन्न
Blog

भारतीय सविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान दिवस सोहळा शहीद स्मारक माता रमाबाई आंबेकर नगर घाटकोपर पूर्व येथे संपन्न

दि 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता भारतीय भिक्खू संघ, देव देश प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान दिवस सोहळा शहीद स्मारक माता रमाबाई आंबेकर नगर घाटकोपर पूर्व येथे आयोजित करण्यात आला.
संविधान दिवस सोहळ्याचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन डॉ रविंद्र कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री रविंद्र कांबळे यांनी संविधान उद्धेशिका वाचन करून केली.
संविधान दिवस सोहळ्याचे प्रमुख वक्ते श्री नागेशजी धोंडगे (संविधान अभ्यासक) यांनी खूप छान पणे संविधान बद्दल मार्गदर्शन केले. संविधानाचा इतिहास, रचना, संविधान देशासाठी का महत्त्वाचे आहे ? हे समजावले. संविधान दिवस सोहळ्यामध्ये संविधानाची एक प्रत प्रत्येकाच्या घरात असणे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.
या सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थिती भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भिक्खू विरत्न महाथेरो हे होते.
या संविधान सोहळ्यामध्ये जे तळागाळात जाऊन समाजासाठी काम करणाऱ्या १४ मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यातील सन्मानमूर्तीची नावे खालील प्रमाणे
१ स्वरूप रविंद्र नेटवटे
( सामाजिक)
२ सुमन भानुदास उघडे
( कचरावेचक पर्यावरण)
३ रविंद्र विष्णू गोळे
( पत्रकारिता)
४ अविनाश रघुनाथ कदम
( सामाजिक)
५ दिलीप महादेव भालेराव
(संविधान जनजागृती, सामाजिक, शैक्षणिक)
६ ज्योती शशिकांत बनसोडे
(आरोग्य सेविका)
७ अनिल सदाशिव कदम
( सामाजिक)
८ मधुसूदन निरंजन पॉल
( स्मशान भूमी कर्मचारी, पर्यावरण)
९ मालती रतन हवालदार
( सामाजिक, महिला सक्षमीकरण
१० अमोल महादेव दहीवले
( धम्मजागरण, समाज प्रबोधन)
११ वैभव सुभाष ठाकरे
(पर्यावरण)
१२ शशिकला गवाराम खरात
( सामाजिक )
१३ संध्या नंदकिशोर अंबाडे
( सामाजिक )
१४ लक्ष्मी वसंत देसाई
( अन्नपूर्णा)
या सन्मान मूर्तींना सन्मानित करण्यात आले.
या संविधान सोहळा प्रमुख उपस्थिती देव देश प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ वैभव देवगिरकर, संविधान वार्ताचे मुख्य संपादक श्री विनोद कांबळे आणि त्यांचे सहकारी अनिलकुमार शेट्टी, छबी सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राहुल पाठारे आणि महासचिव श्री पार्था रॉय. त्याच प्रमाणे पत्रकार प्रशांत बढे, पत्रकार तानाजी कांबळे, घे भरारी संस्थेचे अध्यक्ष स्नेहाताई भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
संविधान दिवस सोहळ्याचे आयोजन आणि नियोजन देव देश प्रतिष्ठानचे डॉ रविंद्र कांबळे यांनी केले आणि देव देश प्रतिष्ठानचे श्री जय गणेश लिंगातर, श्री शशिकांत तायडे, श्री अमर चव्हाण, श्री रविंद्र कांबळे यांच्या रात्र-दिवस केलेल्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला

Exit mobile version