
घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली.
धुळे: शिरपूर तालुक्यात एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. काल शुक्रवारी (15 ऑगस्टच्या) दिवशी धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 8 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे (वय 28, व्यवसाय – हॉटेल) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली.
15 ऑगस्ट रोजीच आरोपीने 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांमध्ये संताप उसळला. आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आज सकाळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे टिम दाखल झाले होते, यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सदर घटनाची पाहणी केली. या घटनेनंतर संपूर्ण शिरपूर तालुका हादरून गेला आहे. संतप्त जमावाने आरोपीच्या हॉटेलची तोडफोड केली असून प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988