Airoli Vidhan Sabha : भाजपच्या गणेश नाईकांची सत्ता कायम, ऐरोली विधानसभा मतदारसंघ चुरशीची लढत
ऐरोली विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचं वर्चस्व कायम असून गणेश नाईक यांनी विजय मिळवला आहे. 2009 आणि 2014 मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण, 2019 मध्ये इथे भाजपने सत्ता काबीज केली. भाजपने सलग दुसऱ्यांदा गणेश नाईक यांना तिकिट दिलं आणि त्यांनी गड कायम राखला. सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गणेश नाईक यांना दणदणीत विजय मिळवला