साईम माळगुंडकरची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी, दोन रौप्य पदके पटकावली – मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री. विनोद जानवळकर यांनी केला सन्मान
आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अली पब्लिक स्कूलचा इयत्ता ८ वीचा विद्यार्थी साईम सरफराज माळगुंडकर याने क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. २१ सप्टेंबर रोजी पुणे बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ३७ व्या MKBA महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत साईमने चमकदार कामगिरी करत दोन रौप्य (सिल्वर) पदके पटकावली.महाराष्ट्र किक बॉक्सिंग