महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
नवी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीतील घटक पक्ष एकत्र येऊन लढतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असतानाच, नवी मुंबईत भाजपचे वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेनेत दिलजमाई करणे शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्य होईल का ही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद अशा सर्वच