एक नवा इतिहास रचणारा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश
विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी बुद्धिबळ विश्वविजेता ठरला दुसरा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश आणि एक इतिहासच रचला आहे. डी. गुकेश आता बुद्धिबळाचा बादशहा असुन त्यांनी चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत केले आहे. हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे.