डोंबिवली लोढा हेवन येथे दुचाकी खड्ड्यात आपटून ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू
डोंबिवली : डोंबिवली जवळील लोढा हेवन भागात दुचाकीवरून जात असताना दुचाकीवर दुचाकी स्वाराच्या पाठीमागील आसनावर बसलेल्या ६१ वर्षाच्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भारती विजयकुमार भोई (६१) असे मरण पावलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेचे नाव आहे. भारती भोई यांचा मुलगा जतीन भोई (३५) यांनी याप्रकरणाची
