आबलोली (संदेश कदम)
कोकण म्हणजे नारळी आणि पोफळी चे माहेरघर उंच उंच नारळाची आणि पोफळीची झाडे पाहून कोकणचे वैभव अधिक वाढते पण याच झाडावर चढणारे व नारळ सुपारी पाडून झाड सफाई करणारे कुशल कामगार मिळणे मुशकील झाले आहे कोकणातील गुहागर, दापोली, रत्नागिरी सह अन्य ठिकाणी नारळाच्या बागा मोठया आहेत कोकणात व तळ कोकणातील जनतेला मात्र आता या बाबतीतील कुशल कामगार मिळत नाहीत यासाठी बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी आता पुढाकार घेत हा व्यवसाय एक उत्तम रोजगार म्हणून पहात यासाठी कोकणातील कृषी क्षेत्रतात आवड असणाऱ्या नवं युवकांना ( वयोगट 18 ते 30 ) उत्तम प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे याचा मूळ उद्देश रोजगार निर्मिती आहे कोकण परिसरात आज अनेक अशिक्षित तरुण बेरोजगार आहेत साधारणपणे एक कुशल कामगार महिना 25 हजार रुपये सहज उत्पन्न प्राप्त करू शकतो असा दावा पराग कांबळे यांनी केला आहे या साठी बळीराज सेनेचे पदाधिकारी यांचे सहकार्य घेऊन वरील प्रशिक्षणचा उपक्रम राबविण्यात येईल असे बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988