Sanvidhanvarta Blog Blog महाबोधी महाविहारासाठी बौध्द भिक्खुंचे प्राण पणाला
Blog आणखी ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

महाबोधी महाविहारासाठी बौध्द भिक्खुंचे प्राण पणाला

मुंबई ( २३ फेब्रुवारी २०२५)- बिहार मधील तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहारावर अबौद्ध लोकांचा कब्जा प्रस्थापित करणारा बोधगया टेम्पल ॲक्ट (१९४९) रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील बौद्ध भिख्खूनी आपले प्राण पणाला लावले आहेत. गेल्या १२ दिवसांपासून त्यांचे आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे.

त्या आंदोलनाला महाराष्ट्रातील बौद्ध जनतेने सक्रिय पाठिंबा देवून बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठीचा लढा यशस्वी करावा ,असे आवाहन भदंत सदानंद महाथेरो आणि बुद्धिस्ट कल्चरल असोसिएशन चे अध्यक्ष रवी गरुड यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. त्या दोघांनी आकाश लामा यांची भेट घेवून बोधगया येथील आमरण उपोषणात नुकताच लाक्षणिक सहभाग घेतला होता. मुंबईत परतल्यावर त्यांनी बौद्ध समाजाला राज्यातही आंदोलन सुरू करण्यासाठी हाक दिली आहे.

महाबोधी महाविहारावर व्यवस्थापन आणि नियंत्रणाचा हक्क बौद्धांना नाकारणारा बोधगया टेम्पल ॲक्ट हा संविधानातील २५,२६, २९ या कलमांचे उल्लंघन करणारा आहे. तसेच बौद्धांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणून अल्पसंख्यांक म्हणून त्यांना असलेल्या अधिकारांची पायमल्ली करणारा आहे, असे भदंत सदानंद महाथेरो आणि रवी गरुड यांनी एका पत्रकात म्हटले आहे.

बोधगया टेम्पल ॲक्टमुळे महाबोधी महविहारावरील अधिकारापासून बौद्धांना वंचित करण्यात आले आहे. व्यवस्थापन समितीत अबौद्धांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यामुळे त्या महाविहारात बुध्दाच्या धम्माशी विसंगत असेवैदिक पद्धतीचे विधी राजरोसपणे चालत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आपला विनीत

( रवीभाउ गरुड)
अध्यक्ष,
बुद्धिस्ट कल्चरल असोसिएशन

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version