“अगं हे नाणं दिसतया शोभून”, “शीलवान भारी गुणवान” त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना “जीवाला जीवाचे दान” या कॅसेट मधून प्रथमच मराठीतून गाणी गाण्याची संधी दिली. तसेच त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी असंख्य अवीट गाणी लिहिली गायली व संगीतबद्ध केली.
तसेच सबंध महाराष्ट्रात भीम बुद्धांची गाणी गाऊन प्रबोधन केले. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, श्रावण यशवंते यांच्या पिढीतील व मित्रपरिवारातील एक पहाडी आवाजाचा गायक तसेच आनंद शिंदे, मिलिंद शिंदे व नव्या पिढीतील लोक गायकांना मार्गदर्शक व गुरुस्थानी असणारे पोखरीकर दादा यांचे वास्तव्य विटावा कळवा या ठिकाणी बराच काळ राहिले.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा या ठिकाणी उपचारादरम्यान दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ५ वाजता. वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने भीम बांधवांचे तसेच आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे.
त्यांचे पार्थिव रमाबाई कॉलनी घाटकोपर येथे दुपारी ३:०० वाजता अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल व सायंकाळी सहा वाजता दादर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988