दिनांक 10. 10 .2025 रोजी दादर येथील आंबेडकर भवन मध्ये रिपब्लिकन सेनेचे केंद्रीय कार्यालय या ठिकाणी बहुजन हृदय सम्राट, तरुणांचे प्रेरणास्थान, सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय वीरेंद्र लगाडे साहेब व महासचिव दीपक पहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे महासचिव मा. बोधनकर साहेब, ठाणे जिल्हाध्यक्ष आबासाहेब चासकर, ठाणे जिल्ह्याचे नेते पंढरीनाथ गायकवाड साहेब, धायजे साहेब असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रवेश केलेले व नवनियुक्त पदाधिकारी ऍड.सौ .पल्लवी राजपक्ष, प्रमुख कायदेशीर सल्लागार. साईनाथ माने साहेब, उपाध्यक्ष नवी मुंबई जिल्हा. अक्षय मोरे साहेब, ऐरोली तालुका महासचिव. सुभाष यादव, उत्तर भारतीयांचे नेते. बिपिन प्रसाद, नवी मुंबई मुख्य संघटक युवा. अमोल पहुरकर, युवा. आकाश कांबळे, वाशी जुगाव संघटक.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988