गुहागर (प्रतिनीधी)
हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख आदरणीय श्री. धनंजयभाई जयराम देसाई यांच्या पुण्यातील निवास निवास स्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व 35 ते 40 गुंड यांना घेऊन कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन व प्रशासकीय आदेश नसतानाही 4 जे.सी.बी. व 2 पोकळलेंड ने घर पाडण्यास सुरुवात केली. घरामध्ये 90 वर्षाची वयस्कर व्यक्ती व महिला उपस्थित होते.आलेल्या गुंडांनी घरातील महिलांना व 14 वर्ष मुलीला शस्त्रांचा धाक दाखवून छातीला, हाताला व कपड्यांना धरून बाहेर ओढत आणले तिचा विनयभंग केला. आणि वृद्ध व्यक्तीस घरातच ठेवून घर पाडण्यास सुरुवात केली.
या प्रकारचा भीषण त्रास घरातील लोकांना देत असताना अडविण्यासाठी गेले असता. महेश खाडे या व्यक्तीने आम्हीं काहीही करू तुम्हांला काय करायचं असे म्हटले तेव्हा घरातील लोकांनी 112 या क्रमांकावर संपर्क केल्यामुळे पोलीस संबंधित ठिकाणी आले. परंतू तिथे त्यांनी पूर्णपणे एकतर्फी व बघ्याची भूमिका घेतली. आत 90 वर्षीय वृद्ध आहे.हा प्रकार थांबवा असे सांगून देखील पोलिसांनी ते न थांबवता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा असा सल्ला दिला. व घरातील काही मुले घर पाडणार्यांना विरोध करताहेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकून पोलिसांनी त्यांना गाडीत बसून ठेवले.
मुळात कोणताही प्रशासकीय पद्धतीचा वापर न करता घरावर अश्या प्रकारचा दरोडा टाकण्याचा प्रकार चालू असताना पोलीस प्रशासनाने ते थांबविले का नाही? पोलीस प्रशासनाच्या या एकतर्फी भूमिकेमुळे त्या घरातील लोकांना भीषण त्रास सहन करावा लागला. तरी वरील सर्व प्रकार लक्षात घेऊन क्रूर मनोवृत्तीच्या विलास परमार, महेश खाडे सोबत 35 ते 40 गुंड यांचेवर दरोडा, घरफोडी, मारहाण अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व तिथे उपस्थित पोलीस अधिकारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांची कसून चौकशी व्हावी अशी नम्रविनंती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे हिंदुराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मिनेश अरुण कदम, गौरव पावसकर, सुजित नाईक, अभिमाने, सुशील कदम, जोशी सर, स्वयंम नायर, शैलेश बेर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988