पंचशील नगर मधील पुनर्वसन इमारतीच्या “डी” विंग मधील रिकाम्या गळ्यात शिवसेना (उबाठा) पक्षाचे कार्यकर्ते बेक़ायदेशिरीरत्या शिवसेना शाखा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. सदर “डी” विंग मध्ये बुद्ध विहाराचे बांधकाम प्रस्तावित असताना त्या बुद्ध विहाराच्या बाजुलाच शिवसेना शाखा उघड़ने हे भविष्यामध्ये इतर वादाला आमंत्रण देण्यासारखे असून कायदा व सुव्यवस्थेचे वारंवार उल्लंघन करणारा आहे.
स्थानिक मराठवाड़ा गृहनिर्माण संस्थेने या बेक़ायदेशीर ताब्याला विरोध केला असून शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कायदेशीर नोटिस काढण्यात आली, नोटिस न घेतल्यामुळे नोटिसचा मोठा बैनर लाउन जाहिरपणे नोटिस बजावण्यात आली.
पंचशील नगर मधील रहिवाशांच्या हाकेला कधीच धाउन न येणारे शिवसैनिक आज स्वताहाच्या शाखेचा ताबा घेण्यासाठी पंचशील मधील लोकांवर धाउन जात आहेत ही मोठी शोकांतिका आहे.
स्थानिक रहिवाशी मागील १५ वर्षापासून बेघर असताना शिवसेना शाखेसाठी घूसखोरी करणारे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाही.
मराठवाडा सोसायटिने तेथील स्थानिक रहिवाशी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांना या लढ्यात शामिल होण्याचे आव्हाहन सुद्धा केले आहे, तसेच पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा पत्रव्यवहार केला आहे.
पंचशील नगर मधील पुनर्वसन इमारतीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाचे कार्यालय आम्हाला नको, बुद्ध विहाराच्या बाजूला शिवसेना शाखेचे कार्यालय आम्हाला नको…!!!! अशी भूमिका आता सर्व रहिवाशांनी असताना शिवसैनिकांची त्यांच्या शाखेसाठीची घूसखोरी जनतेच्या विरोधातील आहेच शिवाय जातीय तेढ निर्माण करणारी सुद्धा आहे.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988