Sanvidhanvarta Blog Blog 3 ऑगस्ट रोजी गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन. मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

3 ऑगस्ट रोजी गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन. मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती

आबलोली (संदेश कदम )
अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका गुहागर यांचे सौजन्याने श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या भजन महोत्सवाला मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती लाभणार असून तालुक्यातील भजन प्रेमी जनतेने या श्रावण भजन महोत्सवाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आव्हान अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
गुहागर तालुक्यामध्ये प्रथमच श्रावण भजन महोत्सव 2025 चे आयोजन रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. भजन परंपरा टिकून राहणे कलाकाराला आपली कला जोपासता यावी आणि भजन माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे आणि हिंदवी भागवत सनातन धर्माचा पताका उंच उभारावा या उदात्त हेतूने ईश्वर रूपे सेवेचा मिळालेला वारसा जपता यावा आणि जनतेला त्याचा लाभ व्हावा म्हणून तसेच वृद्ध कलाकारांना वृद्ध काळात दुसऱ्यावर अवलंबून न राहता त्यांना आपण केलेल्या कलेच्या सेवेचा शासनाकडून मोबदला मिळावा तसेच सर्व भजनी कलाकार एक व्हावे, सर्व भजनी कलाकार संघटित राहावे यासाठी या श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


भंडारी भवन गुहागर कीर्तनवाडी रोड गुहागर येथे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न होणार असून सकाळी 8:00 वाजता दिंडी सोहळा देवस्थान ते भंडारी भवन सकाळी 10:00 वाजता कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होईल त्यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि मनोगत हा कार्यक्रम होईल सकाळी 10:30 वाजता गुहागर तालुक्यातील भजन मंडळांचे सादरीकरण तसेच आयोजक मंडळातील ज्येष्ठ कलावंतांचे सादरीकरण त्यानंतर दुपारी 12:00 वाजता 60 वर्षावरील वृद्ध कलाकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर दुपारी 01:00 वाजता स्नेहभोजन कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर रात्री 8:00 वाजता मेळाव्याची सांगता होणार आहे.
यावेळी अखिल भजन सांप्रदाय हीतवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भगवान बुवा लोकरे,सचिव प्रमोद बुवा हर्याण, सदस्य श्रीधर बुवा मुणगेकर, सल्लागार प्रकाश बुवा चिले, माउली सावंत,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष बुवा सि शिर्षेकर उपाध्यक्ष संजय बुवा सुर्वे आदी.मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी गुहागर तालुक्यातील भजन प्रेमी जनतेने या श्रावण भजन महोत्सवाला वेळेत बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अखिल भजन संप्रदाय हीतवर्धक मंडळ गुहागर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version