डॉक्टर राजेंद्र जाधव गेली 40 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित असून त्यांनी बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार ही संकल्पना 14 एप्रिल 2021 मध्ये मांडली आणि हा एका दशकांचा महत्वाकांक्षी उपक्रम असून त्यावर ते काम करत आहे. देशात आणि परदेशात ही संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊन जान्यासाठी प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांची ज्या ठिकाणी पावले लागली त्या ठिकाणचे माती आणण्याचा उपक्रम गेली 27 वर्षे करीत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना अनेकांचे सहकार्य लाभले आहे. आज त्यांनी देव देश प्रतिष्ठान च्या ऑफिसला भेट देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला. पाच आणि सहा डिसेंबरला देव देश प्रतिष्ठान आणि भारतीय भिकू संघ राज्यातील आणि देशातील जे भिखु चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी येणार आहे त्यांच्या आरोग्याची तपासणी त्यांना चष्मे वाटप त्यांना चिवरदान आणि आर्थिक मदत अशा पद्धतीचा जो कार्यक्रम देव देश प्रतिष्ठान यांनी केलेला आहे त्याची सुद्धा त्यांनी खूप स्तुती केली.
यावेळी देव देश प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय डॉक्टर वैभव गिरकर देव देश प्रतिष्ठानचे डॉक्टर रवींद्र कांबळे संविधान वार्ताचे मुख्य संपादक विनोद कांबळे आणि छबी सहयोग फाउंडेशन चे पार्था रॉय यांनी त्यांना बुद्ध मूर्ती देवून त्यांचे स्वागत केले.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988