Sanvidhanvarta Blog Blog वृद्ध महिलेला फसवून तिच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट…
Blog

वृद्ध महिलेला फसवून तिच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट…

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या टिळकनगर भागात १५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी एका वृद्ध महिलेला फसवून तिच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपी महिलेला पकडून लंपास केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत.

फिर्यादी हंसा जयंतीलाल पांचाळ (६२),या गृहिणी, हिरण पार्क,डोंबिवली येथे राहतात.फिर्यादी गणपती मंदिर,हिरण पार्कजवळून जात असताना एका अज्ञात महिलेनं त्यांना “वृद्ध महिलांना पैसे मिळत आहेत, पण त्यासाठी दागिने काढून ठेवावे लागतील” असे सांगितले.आरोपीने हंसा पांचाळ यांच्याकडील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, १० ग्रॅमची सोन्याची चेन,आणि ५ ग्रॅमच्या दोन कानातल्यांचा संच असा सुमारे २.१० लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

सुषमा अंधारे fire नहीं wildfire है! #परभणी #marathinews

फिर्यादीने १६ डिसेंबर रोजी टिळकनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तत्काळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला.पोलीस उपनिरीक्षक तेजल पवार आणि त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली.आरोपी महिलेला ओळखल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला ताब्यात घेतले. महिला पंचांच्या उपस्थितीत आरोपीची अंगझडती घेतल्यावर फिर्यादीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात आले.

या यशस्वी तपासासाठी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव,पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तपास पथकात श्रे.पो.उपनिरीक्षक चौगुले, पोहवा कांबळे, पगारे, राठोड, आणि मपोशि पोटघन यांचा समावेश होता.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा फसवणूक प्रकरणांपासून सतर्क राहावे व कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.

टिळकनगर पोलिसांच्या या जलद आणि यशस्वी तपासामुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला असून, नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988


Exit mobile version