प्रतिनिधी — परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना प्रकरणी आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशी करावी. या मागणीसाठी एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शन दिनांक 20/12/2024 रोजी सकाळी ठीक 12 वाजता एरंडोल तहसीलदार श्री. प्रदीप पाटील साहेब यांना एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ बाविस्कर तसेच महीला आघाडी च्या तालुकाध्यक्ष सौ. माया ताई खैरनार यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुक्यातील तमाम भीमसैनिक सह निवेदन सादर करण्यात आले.सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले की परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना झाली म्हणून लोकशाही मार्गाने न्यायिक लढा उभारणारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूस ( खून च ) कारणीभूत पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड सह इतर पोलीस अधिकारी यांच्यावर कलम ३२ अन्वये ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कलम ३(१) आणि ३(२) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत.
परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्ही जप्त करून ते तपासावेत, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत करावी.
यावेळी तहसील परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जय घोष घोषणा करून निवेदन सादर करण्यात आले. महीला आघाडी तालुका सचिव सुनिता भोई, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सचिन बागुल, किरण पानपाटील, बंडू पाटील, जितेंद्र वाघ,शाम शिंपी, संजय जगताप,आपा बोरसे, अनिल गायकवाड, साहेबराव पानपाटील, अनिल बोरसे, कैलास वाघ, विजय पवार,बालु सरदार, विकास बनसोडे, अक्षय पानपाटील, जुनेद शेख, रणजित बोरसे, विवेक पानपाटील, नारायण बोरसे, स्वाती मोरे, करुणा पवार, जयश्री अमृत सागर, विद्या सैदाणे, अर्चना अहिरे, सविता सोनवणे, सुवर्णा शिरसाट, दुर्गेश्वरी पाटील, संगीता खैरनार, मुमताज बी शेख तसेच कैलास कुंभार, जगदीश पवार, फारुख खाटीक, देवराम भोई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988