प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर : अखिल महाराष्ट्र ग्रामीण शिक्षण विकास मंडळाचे शरदचंद्र पवार मतिमंद विद्यालय आपुलकी निवास मतिमंद विद्यालय जटवाडा रोड छत्रपती संभाजी नगर व सावली मतिमंद विद्यालय जालना यांच्या वतीने मतिमंद मुलांची वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न झाला असे की शरदचंद्र पवार मतिमंद विद्यालय आपुलकी मतिमंद कर्मशाळा व सावली मतिमंद विद्यालय जालना या शाळेत मतिमंद मुला-मुलींचे वैद्यकीय तपासणी मानसिक आरोग्य तज्ञ माननीय श्री डॉक्टर चिन्मय बराळे राहुल कडे व त्यांचे सहकाऱ्यांनी 80 मतिमंद मुलांची तपासणी करून आजाराचे निदान केल्यानंतर औषधोपचार करण्यात आले त्यानंतर मतिमंद मुलांच्या पालकांचा मेळावा आयोजित करून पालकांना त्यांच्या मुलांबाबत माहिती दिली व त्यांच्याकडून सूचना घेतल्या या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष माननीय श्री बादशाह पटेल, माननीय डॉक्टर चिन्मय वराळे, डॉक्टर राहुल कळते, डॉक्टर दिसेना पटेल, डॉक्टर शोएब कादरी, मुख्याध्यापक श्री साजिद पटेल, सय्यद जावेद, विजय महाजन, साध्या पठाण, अमोल बदर, सुनील बदर व संपूर्ण पालक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले शेवटी आभार श्री संदीप बडक यांनी मांडले.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988