विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी बुद्धिबळ विश्वविजेता ठरला दुसरा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश आणि एक इतिहासच रचला आहे. डी. गुकेश आता बुद्धिबळाचा बादशहा असुन त्यांनी चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत केले आहे. हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. मग ते कँडिडेट्स असो, बुद्धिबळ ऑलिम्पियाड असो किंवा जागतिक स्पर्धा असो. बुद्धिबळाच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरांनी उमटवणारा भारताचा लाडका बुद्धिबळपटू डी गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोम्मराजू असून त्यांचा जन्म २९ मे २००६ मध्ये चेन्नईत झाला. त्याच्या वडिलांचं नाव रजनीकांत आणि आई पद्मा वडील कान, नाक आणि घश्याचे सर्जन तर आई या सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ आहेत. डी.गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली. आपल्या मुलाने केलेल्या कामिगिरीमुळे त्याच्या वडिलांची छाती अभिमानाने भरून आली असुन आजचा हा क्षण त्याच्यासाठी आभाळ ठेगणं करणारा आहे. ज्या शाळेत विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू शिकले त्याचं शाळेचा डी गुकेश विद्यार्थी, अंडर-१० चॅम्पियन असलेल्या ग्रँडमास्टर प्रज्ञानंदला पाहूनच डी. गुकेशने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. डी गुकेशनेही आपल्या लहान वयातच बुद्धिबळ हेच आपले ध्येय आहे हे ठरवले होते आणि नेमके याच कारणामुळे त्याने चौथीनंतर नियमित शाळेत जाणे बंद केले आणि संपूर्णपणे बुद्धिबळवर लक्ष केंद्रीत केले. डी गुकेशच्या स्वप्नासाठी त्याच्या आई – वडिलांनीही आपले सर्वस्व पणाला लावले होते लहान असलेल्या गुकेशसह त्याचे वडिल प्रत्येक टूर्नामेंटला जायचे. महिन्यातील १५ दिवस डी गुकेश बरोबर ते प्रत्येक टूर्नामेंटला जात असत आणि उर्वरित १५ दिवस आपले काम (शस्त्रक्रिया) करत असत. डी. गुकेशने २०१५ मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्याने २०१८ मध्ये १२ वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. २०१८ च्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ५ सुवर्णपदकं जिंकली.
फ्रान्समधील ३४वी ओपन डी कॅपेले ला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा झाल्यानंतर मार्च २०१८ मध्ये तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला. २०१९ पर्यंत तो जगातीआल सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. तर भारताचाही सर्वात तरुण ग्रँडमास्टर आज ठरला आहे.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988