“द सोशल सर्व्हिस लीग” ही संस्था गेल्या ११४ वर्षांपासून परेल विभागात समाजकार्य क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात आणि कौशल्याधारित शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेतून भारतातील पहिला सहा महिन्यांचा समाजकार्य प्रशिक्षण वर्ग १९२४ साली संस्थेचे तत्कालीन सचिव कामगार नेते ना. म. जोशी यांनी सुरू केला. या प्रशिक्षण वर्गास २०२४ ला १०० वर्षे पूर्ण झाली. या वर्षी हा प्रशिक्षण वर्ग १०१व्या वर्षांत पदार्पण करून त्या अनुषंगाने “एन. एम. जोशी डिप्लोमा इन सोशल वर्क अॅण्ड कम्युनिटी मेटल हेल्थ” हा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स जुलै २०२५ पासून सुरू होत असून याबाबत अधिक माहितीसाठी अभ्यासक्रम समन्वयक प्रा. प्राजक्ता सावंत यांच्याशी ९८९२९७२३३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988