Sanvidhanvarta Blog Blog चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना
Blog

चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना

नवी मुंबई : आज सकाळी सहाच्या सुमारास शीव पनवेल महामार्गावर जुईनगर रेल्वे स्टेशन समोर एका भरधाव कारने दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक रिक्षा चालक ठार झाला तर दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला. 

सकाळी सहाची वेळ असल्याने जुईनगर रेल्वे स्टेशन बाहेर आणि त्याच्या समोरील शीव पनवेल मार्गावर रिक्षांची वर्दळ असते. त्यात रिक्षा चालक घनश्याम जैस्वाल आणि राजेंद्र वनकळस यांना चहाची तल्लफ आली म्हणून ते चहा पिण्यासाठी थांबले. चहा पिऊन रिक्षात बसले असता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरून एक कार भरधाव वेगात आली आणि या रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षांना जोरदार धडक दिली. यात घनश्याम यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालक विष्णू राठोड याला नेरुळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिली.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version