4 सप्टेंबरला आबलोली येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन
आबलोली (संदेश कदम )
सध्याची आपली राजकीय परिस्थिती पाहता जे आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेले आहेत या पक्षप्रवेशाला आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री उदयजी सामंत हे उपस्थित होते आणि तो मेळावा आणि तो पक्षप्रवेश खूप दणक्यात आणि उत्साहात संपन्न झाला त्यामुळे हा पक्षप्रवेश ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची नांदी असून येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत आमचा करिष्मा दाखवून देऊ असा स्पष्ट इशारा शिवसेना शिंदे पक्षाचे तालुकाप्रमुख दीपक कानगुटकर यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
https://www.youtube.com/sanvidhanvarta
शिवसेना शिंदे पक्षाची पत्रकार परिषद नुकतीच गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. यावेळी तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर हे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की आमच्या पक्षप्रवेशानंतर वेळणेश्वर गटात त्याच ठिकाणी विद्यमान आमदारांना मेळावा घ्यावा लागतो. बारा वर्ष विद्यमान आमदार बरोबर आम्ही काम केले होत. त्यांचा इतिहास आहे की त्यांना पक्ष सोडून गेल्या नंतर त्या कार्यकर्त्यांची त्यांनी कधीच नाव घेतलेले नाही किंवा त्यांनी तसा उल्लेखित त्या व्यक्तीचा किंवा त्या पदाधिकाऱ्याचा केलेला नव्हता पण या वेळेला त्यांनी सौ.नेत्रा ठाकूर आणि महेश नाटेकर यांचा पक्षप्रवेश झाल्याबरोबर वेळणेश्वर गटात त्याच ठिकाणी जो मेळावा घेतला त्यामुळे असं वाटायला लागले की काहीतरी राजकीय अस्थिरत: निर्माण होते की काय असं त्यांना वाटलं असेल? म्हणूनच त्यांनी हा मेळावा घेतला अशी शंका दीपक कनगुटकार यांनी व्यक्त केली
दीपक कनोटकर पुढे म्हणाले की, खोतकी ही ब्राह्मण समाजातून कधीच नष्ट झालेली आहे. खोतकी ही फक्त आता भंडारी समाजात आहे. ती पण मानासाठी आहे येत्या 4 सप्टेंबर रोजी आबलोली येथे आमच्या पक्षाचा जाहीर मेळावा होणार असून या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे. जि. प. पं. स. निवडणुकीची नांदी असणार आहे अशी माहिती शिवसेना शिंदे पक्षाचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अमरदीप परचूरे, शहर प्रमुख निलेश मोरे, जिल्हा परिषद पडवे गटाचे युवा सेना
उपतालुकाप्रमुख संदेश काजरोळकर आदी. पदाधिकारी उपस्थित होते.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988