Sanvidhanvarta Blog Blog महसूल दिनी गुहागर तालुका तहसील कार्यालय अंतर्गत आबलोली मंडळ पदाधिकारी, कर्मचारी यांचा पुरस्कार देऊन गौरव
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

महसूल दिनी गुहागर तालुका तहसील कार्यालय अंतर्गत आबलोली मंडळ पदाधिकारी, कर्मचारी यांचा पुरस्कार देऊन गौरव

आनंद काजरोळकर, विनोद जोशी, प्रकाश बोडेकर, ए.बी. बरकडे पुरस्काराने सन्मानित

आबलोली (संदेश कदम )
आबलोली मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर,आबलोली ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी, आबलोली महसूल सेवक प्रकाश बोडेकर, भातगाव येथील ग्राम महसूल अधिकारी ए.बी.बरकडे यांना महसूल दिनी ज्ञान रश्मी वाचनालय गुहागर येथे गुहागर तालुका तहसील कार्यालयाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

https://www.youtube.com/sanvidhanvarta

सन 2024 – 25 या महसूल वर्षांमध्ये गुहागर महसूल विभागात उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल महसूल सप्ताह 2025 चे औचित्य साधून उत्कृष्ट अधिकारी, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले आणि यापुढे महसूल प्रशासन अधिकाधिक लोकभिमुख व गतिमान करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विचारपीठावर गुहागरचे कार्यतत्पर तहसीलदार परीक्षित पाटील, निवासी नायब तहसीलदार विद्याधर वैशंपायन, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती स्नेहल मेहता, गुहागरच्या पुरवठा निरीक्षक श्रीमती भावना दताळे आदी. मान्यवर उपस्थित होते.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version