Sanvidhanvarta Blog Blog या वर्षांपासून कोकणवाशीय गणपती उत्सव साजरा करणार असे म्हणा बळीराज सेना पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे आदेश
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

या वर्षांपासून कोकणवाशीय गणपती उत्सव साजरा करणार असे म्हणा बळीराज सेना पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे आदेश

आबलोली (संदेश कदम)
मुंबई,कोकणचा सर्वसामान्य जनतेचा ढाण्या वाघ म्हणून पाहिले जाते ते बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांनी कोकणवासीय यांना म्हटले आहे की, यावर्षी पासून कोकणातील जनता चाकरमानी नाही तर कोकणवाशीय नागरिक म्हणून गणेशोत्सव साजरा करतील. बळीराज सेनेच्या सर्व पदाधिकारी यांना त्यांनी तसे आदेश सोडले आहेत आणि या बदलाचे पालन करावे अशी समस्त कोकणकरांना विनंती केली आहे


कोकणातील जनता मुंबई,ठाणे, पुणे आदी ठिकाणी नोकरीं, व्यवसाया निमित्ताने गाव सोडून बाहेर असतात. मात्र त्यांचा चाकरमनी म्हणून उल्लेख करून आमच्या कोकणी जनतेची प्रतारना केली जाते. कारण चाकरमणी म्हणजे फक्त चाकरी करणारा. आज तोच चाकरमनी व्यवसायिकही झालेला आहे. चाकर याचा अर्थ नोकर, दास असा होतो. म्हणून यापुढे कोकणवासीयांना चाकरमनी असे न संबोधता कोकणवासिय असे म्हणावे. अशी माहिती अशोकदादा वालम यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version