लातूरमधील औसा शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.
औसा शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. पुण्यावरून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने औसा शहरात आल्यानंतर अचानक पेट घेतला. वेग कमी झाल्याच्या क्षणी टायर फुटल्याने आग लागली आणि काही क्षणांतच ती भीषण स्वरूप धारण करून संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली.
Pls. Subscribe Channel & Share and Like News
https://www.youtube.com/sanvidhanvarta
सुदैवाने, आग लागण्याआधीच आतील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचे सामान आणि वैयक्तिक साहित्य पूर्णतः जळून गेले. आगीचा भडका इतका मोठा होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाला आणि घरालाही आग लागली. या दोन्ही ठिकाणीही मोठे नुकसान झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचा माल खाक झाला आहे. प्रवाशांचा जीव वाचवला असला तरी, मालमत्तेचे झालेले नुकसान आणि प्रवासादरम्यानची ही भीषण घटना प्रवाशांचा थरकाप उडवणारी आहे. औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. तात्काळ प्रशासनास सूचना केल्या.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988