काँग्रेसने स्व. बाळासाहेब ठाकरे अन् सावरकर यांचे गुणगान गाऊन दाखवावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत दिले होते. आपण हे आव्हान स्वीकारले आहे का? असा प्रश्न खासदार हुसेन यांना विचारला असता बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हेच आमच्यासोबत असल्याने आमचे एकमेकांविषयी प्रेम सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मात्र काही बोलणे त्यांनी टाळले.
अखेर घडले महाविकास आघाडीचे दर्शन
मुंबईत रविवारी (दि.१०) महाविकास आघाडीतर्फे झालेल्या जाहीरनामा प्रकाशनाचा लाइव्ह सोहळा व नंतर पत्रकार परिषद होती. तेव्हा तेथे फक्त काँग्रेसचेच पदाधिकारी उपस्थित होते. ‘जाहीरनामा आघाडीचा; उपस्थित पदाधिकारी मात्र काँग्रेसचेच या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे याची चर्चा रंगली. याचीच दखल म्हणून नासिर हुसेन यांच्या पत्रकार परिषदेला खबरदारी घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे छबू नागरे यांना हुसेन यांच्यासोबत व्यासपीठावर जागा देण्यात आली. तर उद्धवसेनेचे उमेदवार वसंत गीते स्वतः पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले. त्यांनी पत्रकारांना हाय, हॅलो करत आम्हीदेखील आलो आहोत, याचे दर्शन घडविले.