मला समजलं, आज या मतदारसंघांमध्ये ओवेसी आले होते. ओवेसींनी या ठिकाणी सभा घेतली. अलीकडच्या काळात ओवेसी देखील पोपटासारखे बोलत आहेत, पण मी ओवेसी यांना कालच सांगितलं, हे हैदराबाद नाही, ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव, देश आणि धर्मासाठी लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चित केलं, तो हा महाराष्ट्र आहे. अरे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही रजाकारांचं सरकार पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न पाहू नका. ओवेसी ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रातनं घालवलं, त्यांना पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न बघाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाढून टाकू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री
तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा
