नवी मुंबई : आज दिनांक 21-12-24 रोजी रिपब्लिकन सेना मुख्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नवी मुंबई शहर अध्यक्ष वीरेंद्र लगाडे साहेब यांच्या पुढाकाराने नवी मुंबई येथील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी आपल्या सर्वांचे नेते, रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष, सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आदरणीय साहेबांनी उपस्थित सर्वांना रिपब्लिकन सेनेच्या पदाचे महत्व समजावून तळागाळातील लोकांसाठी कामे करा, मला तुमच्यातील नगरसेवक, आमदार झालेले पाहायचे आहेत आणी त्यासाठी सर्वांनी मेहनत करून लवकरात लवकर संघटन बांधणी पूर्ण करा असा आदेश साहेबांनी दिला आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी आनंदजी राज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने खालील प्रमाणे पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले.
- संदीप सहदेव सूर्यवंशी- नवी मुंबई उपाध्यक्ष.
- सुनील साळवे. नवी मुंबई जिल्हा सचिव
- वैजनाथ दिगंबर भोसले. संघटक
- रवींद्र दशरथ खंडागळे. जिल्हा खजिनदार.
- शशिकांत कांबळे. जिल्हा उपसचिव
- विनोद गौडर. ऐरोली तालुका उपाध्यक्ष.
- स्वप्निल मोरे. ऐरोली तालुका संघटक.
- राजेंद्र सुरवसे. ऐरोली तालुका उपसचिव.
- मंथन खंडागळे. ऐरोली तालुका, खजिनदार.
- गितेश कांबळे. ऐरोली तालुका उपसंघटक.
- रमेश गायकवाड. ऐरोली तालुका सल्लागार.
- अक्षय कांबळे. बेलापूर तालुका सचिव.
- वारिस अली शेख. ऐरोली.
- नितेश कांबळे. वाशी.
- सौ सुश्मिता मोहिते. अध्यक्ष. नेरूळ शहर
काही दिवसांमध्येच नवी मुंबई मधील असंख्य कार्यकर्ते हे रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत त्यांच्या देखील नियुक्ती अशाच प्रकारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेना राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बौद्धनकर साहेब, सचिव विनोद काळे, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत साहेब, ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर, नवी मुंबई महिला आघाडी अध्यक्ष रेखाताई इंगळे, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष भगवान साळवी भारतीय कांबळे जिल्हा सचिव, उलफत ताई पठाण ऐरोली तालुका अध्यक्ष, सना शेख ऐरोली तालुका सचिव, वैशाली कांबळे ऐरोली विभाग अध्यक्ष, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988