ठाणे – केंद्र सरकार निर्देशनानुसार सुशासन सप्ताह ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री सौरभ राव यांनी राबवला त्यात दिव्यांगांच्या समस्या व प्रश्न मांडताना प्रा. भरत जाधव सर लेखी निवेदन देऊन अनुदानाबद्दल जाब विचारला तत्काळ कारवाई करण्याचे मागणी केली. केंद्र सरकार च्या निदर्शनानुसार देशभरातील सर्व महानगरपालिकेंना सुशासन सप्ताह राबवून नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्न ताबडतोब सोडवावे यासाठी लेखी व भेटून तक्रार दाखल करता येत होती यामध्ये समाज विकास विभाग ठाणे महानगरपालिका यांनी 21 12 2024 रोजी दिव्यांग महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या व प्रश्न बाबत सुशासन सप्ताह राबवला त्यामध्ये विविध संस्था होत असेच अनेक दिव्यांग सहभागी झाले होते त्यामध्ये दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन चे संस्थापक ,राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव सर यांनी यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्य ,महिला ,ज्येष्ठ नागरिक सहभाग नोंदवला. निवेदनाद्वारे तक्रार करून दिव्यांगांचे 2023- 24 व 2024- 25 चे 24 हजाराचे अनुदान दिव्यांगांना दिले नाही व तसेच दिव्यांग कायदा 2016 प्रमाणे ठाणे महानगरपालिकेने दिव्यांगांच्या नोकऱ्या घरे गाळे स्टॉल तसेच नगरसेवक विविध समिती सदस्य स्वीकृत नगरसेवक विविध विषयावर चर्चा करताना माननीय आयुक्त साहेब सौरभ राव व उपयुक्त अनघा कदम मॅडम व तसेच समाज विकास अधिकारी वाघमारे साहेब यांना निवेदन तक्रार व तसेच चर्चा करून ताबडतोब कारवाई करावी तात्काळ सुशासन सप्ताह राबवावी ही विनंती केली नाहीतर दिव्यांग ह्यूमन राइट फेडरेशन या ठाणे शहरांमध्ये व महानगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषण करेल सविधान कायद्याने असं सांगण्यात आले.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

